महाराष्ट्रात 200 एकर जागेत इलेक्ट्रॉनिक्स पार्क

महाराष्ट्रात 200 एकर जागेत इलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारण्यासाठी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ने पुढाकार घ्यावा


- केंद्रीय मंत्री संजय धोंत्रेपायाभुत सुविधांसाठी केंद्र सरकारचे 215 कोटी रू. चे अनुदान


नवी दिल्ली प्रतिनिधी : महाराष्ट्रात 200 एकर जागेत ‘इलेक्ट्रॉनिक्स पार्क’ उभारल्यास हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रातील कंपन्या एकत्रित कार्य करू शकतील व एका पार्क च्या माध्यमातुन नवीन 300 उद्योग उभारले जातील यासाठी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड एज्युकेशन (वेसमॅक) ने पुढाकार घ्यावा. केंद्र सरकारच्या वतीने त्यासाठी आवश्यक ते सहकार्य प्राधान्याने करू असे आवाहन शिक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, माहीती तंत्रज्ञान व दळणवळण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.
‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर’ चे अध्यक्ष ललित गांधी व अन्य पदाधिकार्‍यांनी महाराष्ट्रात विविध ठीकाणी विशेषतः कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात आय.टी.पार्क उभारण्याच्या केलेल्या मागणीसंबंधी नवी दिल्ली येथे मंत्रालयात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
      केंद्र शासन पुरस्कृत प्रत्येक जिल्ह्यात आय.टी.पार्क उभारण्याची योजना बंद झाली असुन, व्यापक स्वरूपाची व सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन्ही उद्योगांना सामावुन घेऊ शकेल अशी ‘इलेक्ट्रॉनिक्स पार्क’ उभारण्याची नवी योजना केंद्राने पुरस्कृत केली असुन महाराष्ट्रातील पहिला ‘इलेक्ट्रॉनिक्स पार्क’ उभारण्यासाठी ‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर’ (वेसमॅक) ने पुढाकार घ्यावा अशी सुचना त्यांनी केली.
यावेळी या प्रकल्पाच्या उभारणीसंबंधीच्या विविध मुद्दयांवर मंत्री महोदय व अधिकार्‍यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
      नाम. संजय धोत्रे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या सुधारीत योजनेनुसार सदर 200 एकरमधील पार्क उभारणीसाठी, यातील पायाभुत सुविधांच्या विकसनासाठी केंद्र सरकारतर्फे 140 कोटी रूपयांचे अनुदान व सामायिक सुविधा केंद्र निर्मितीसाठी 75 कोटी रूपयांचे अनुदान या प्रकल्पासाठी मिळु शकेल.
‘वेसमॅक’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी, मंत्री महोदयांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले व चेंबरतर्फे आवश्यक ती कार्यवाही पुर्ण केली जाईल असे सांगुन सुमारे 3000 कोटी रू. ची नवी गुंतवणुक 250 उद्योगांच्या माध्यमातुन येणार्‍या या पार्कमुळे 5000 हुन अधिक युवकांना थेट रोजगाराच्या संधी मिळणार आहेत ही बाब स्वागतार्ह असल्याचे सांगुन महाराष्ट्र सरकार व लोकप्रतिनिधिंचे सहकार्य घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
     शिक्षण विभागाशी विषयांवर चर्चा करताना, ललित गांधी यांनी शिक्षण क्षेत्रासंबंधी ही विविध विषयांचे सादरीकरण केले. विशेषतः केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठीची मध्यानह भोजन योजना सध्या फक्त अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांनाच उपलब्ध आहे. ती विनाअनुदानीत शाळेतील विद्यार्थ्यांनाही लागु करावी अशी मागणी केली. तसेच शाळांच्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठीच्या योजनांचे राज्याकडुन शिफारस होऊन गेलेले प्रस्ताव दोन-तीन वर्षे प्रलंबित राहतात त्याचा त्वरीत निपटारा होण्याची मागणीही केली.
याविषयांवर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही नाम. संजय धोत्रे यांनी दिली.
यावेळच्या चर्चेत मंत्रालयातर्फे केदार बुरांडे, चेंबरतर्फे संदिप भंडारी, जे.के.जैन यांनी चर्चेत सहभाग घेतला.


    फोटो कॅप्शन : महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारणीसंबंधी नवी दिल्ली येथे बैठकीत सहभागी माहती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, संदिप भंडारी, केदार बुरांडे आदी.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..