विकास कामांना गती देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत

भंडारा जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी नगरपालिका आणि पंचायतीमधील रिक्त पदे तातडीने भरावीत


- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले



मुंबई प्रतिनिधी : भंडारा जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळावी यासाठी नगरपालिका आणि पंचायतीमधील रिक्त पदे पदोन्नती, बदली, प्रतिनियुक्ती अथवा सेवानिवृत्त अधिका-यांची नियुक्ती अशा माध्यमातून तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांनी दिले. आज विधानभवन येथे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, लाखनी, साकोली आणि मोहाडी या नगरपालिका आणि पंचायतीमधील रिक्ते पदे तातडीने भरण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, सहसचिव पांडूरंग जाधव, उपसचिव कल्पिता पिंपळे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


   अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, संबंधित नगरपंचायतीमधील अभियांत्रीकी पदे रिक्त असल्याने विकास कामे पूर्ण करण्यास विलंब होत आहे. संबंधित विकासकामांना गती मिळावी यासाठी अभियांत्रीकी पदे व लेखा शाखेतील पदे पदोन्नती, इतर जिल्ह्यातील बदली, प्रतिनियुक्ती अथवा सेवानिवृत्त अधिका-यांना शासकीय नियमानुसार करार पद्धतीने सेवेत घेण्याची कारवाई करून तातडीने भरण्यात यावी. असे निर्देश विधानसभा अध्यक्ष  पटोले यांनी संबंधित अधिका-यांना दिले.


दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..