कोजागिरीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुंबई प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या यंदाची कोजागिरी सर्वांच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे, भारतीय संस्कृतीत कोजागिरी पौर्णिमेचे अध्यात्मिक, कृषीदृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाशी नाते सांगणारा हा सण आहे. कोकणात भात, नाचणी, वरीसारख्या धान्याचे पूजन करुन नवान्न पौर्णिमा म्हणून हा सण साजरा होतो. कोजागिरी साजरी करण्याच्या या अनेकाविध प्रथा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव टिकवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न सर्वजण मिळून करुया. यंदाची कोजागिरी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन साजरी करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..