बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी फेलोशिपची रक्कम मिळणार
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आमदार सतीश चव्हाण यांना आश्वासन
आमदार सतीश चव्हाण यांना निवेदन देतांना संशोधक विद्यार्थी.
प्रतिनिधी | अाैरंगाबाद : पुणे येथील बार्टीच्या वतीने "डॉ. बाबासाहेब अांबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१८' ही फेलोशिप ४०८ विद्यार्थ्यांना जुलै २०२० मध्ये मंजूर करण्यात आली होती. या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिपचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार सतीश चव्हाण यांना रविवारी (२५ अाॅक्टाेबर) दिले. त्यामुळे अाता एमफिल व पीएचडी करणाऱ्या संशाेधक विद्यार्थ्यांना फेलोशिपची रक्कम मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
अाैरंगाबाद येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष अमोल दांडगे, एसएफआयचे लोकेश कांबळे व "डाॅ. बाबासाहेब अांबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती २०१८' संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या शिष्टमंडळांनी आमदार सतीश चव्हाण यांची भेट रविवारी घेतली. या वेळी संशाेधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांना निवेदत देत जसा ४०८ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्याच ४०८ संशाेधक विद्यार्थ्यांच्या खात्यावर बार्टीने अातापर्यंत एक रुपयाही जमा केलेला नाही. त्यामुळे या संशाेधक विद्यार्थ्यांचे संशोधन रखडले आहे. या विद्यार्थ्यांना फेलोशिपचा पहिला हप्ता मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती या शिष्टमंडळांनी केली. आमदार सतीश चव्हाण यांनी त्वरीत फोनद्वारे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना संपर्क साधून फेलाेशिपचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत दिवाळीपूर्वी सर्व संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिपचा पहिला हप्ता देण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे या संशाेधक विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा प्रश्न मार्गी लागल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी संशाेधक विद्यार्थी कृती समितीचे कल्पना कांबळे, भरत हिवराळे, अभिलाषा चौतमल, सरोज खंडारे, संजय सूर्या, सामाजिक कार्यकर्ते संतोष निकाळजे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष मयूर सोनवणे, शहर कार्याध्यक्ष अमोल दांडगे, राष्ट्रवादी युवती शहर कार्याध्यक्ष दीक्षा पवार, एसएफआयचे जिल्हाध्यक्ष लोकेश कांबळे आदी उपस्थित होते.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..