लोणी-देवकर औद्योगिक क्षेत्रात नवस्थापित कंपनीबाबत बैठक

लोणी-देवकर औद्योगिक क्षेत्रात नवस्थापित कंपनीबाबत बैठक



मुंबई प्रतिनिधी : इंदापूर तालुक्यातील लोणी - देवकर औद्योगिक क्षेत्रात नव्याने सुरू होणाऱ्या ‘Certoplast India Pvt.Ltd.’  या कंपनीच्या स्थापनेबाबत उद्योग राज्यमंत्री कु.अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकादम, प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख हे दुरदृश्य प्रणालीद्वारे व उद्योग संचालनालायचे सह सचिव संजय देगावकर व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.


    यावेळी राज्यमंत्री  तटकरे म्हणाल्या, वन पाइंट विंडो अंतर्गत राज्यात देश-विदेशातून येत्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. त्याअनुषंगाने होणाऱ्या कायदेशीर बाबी तपासून विभागामार्फत कार्यवाही जलद करण्यात यावी.


    राज्यमंत्री भरणे म्हणाले, औद्योगिकदृष्ट्या अनुकूल वातावरण असलेल्या इंदापूर औद्योगिक क्षेत्रात देश-विदेशातून येणाऱ्या नव्या कंपन्यांचे नेहमीच स्वागत असेल. त्यातून या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असेही भरणे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील औद्योगिक क्षेत्रात चार टप्प्यात स्थापण्यात येणाऱ्या या कंपनीमार्फत सुमारे दीडशे करोड रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून जवळपास पाचशेहून अधिक लोकांसाठी  रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.