उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मराठी रंगभूमी दिना’निमित्त शुभेच्छा
मुंबई प्रतिनिधी : मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी लोकजीवनाचं सांस्कृतिक वैभव प्रेक्षकांपर्यंत पोहचवून सर्वांना निखळ आनंद देणाऱ्या, सामाजिक प्रश्नांच्या सक्षम हाताळणीतून महाराष्ट्राचं वैचारिक प्रबोधन करणाऱ्या मराठी रंगभूमीच्या गौरवशाली वाटचालीबद्दल मराठी रंगकर्मींचं अभिनंदन करण्याचा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आपल्या कलाविष्काराच्या माध्यमातून मराठी रंगभूमीची सेवा करणाऱ्या सर्व रंगकर्मींचं तसेच मराठी रंगभूमीच्या रसिक प्रेक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन.
‘मराठी रंगभूमी दिना’च्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा..! अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..