कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये शिवभोजन थाळी सुरू

येवलेवाडी, पिसोळी येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये शिवभोजन थाळी सुरू


ग्रामस्थांच्या गरजा लक्षात घेऊन उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले निर्देशमुंबई प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील येवलेवाडी, पिसोळी येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत शिवभोजन थाळी मंजूर करण्यासंदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ग्रामस्थांच्या गरजा समजून घेऊन संबंधीत यंत्रणांना निर्देश दिले. त्यानुसार येवलेवाडी पिसोळी येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत 1 नोव्हेंबरपासून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील येवलेवाडी, पिसोळी येथे चार ते साडेचार हजार कुष्ठरोग्यांची वसाहत आहे.  याठिकाणी कुष्ठरोग्यांना शिवभोजन थाळी सुरू करण्यासंदर्भात माजी सरपंच मच्छिद्र दगडे व  सामाजिक कार्यकर्ते  डेव्हिड वंगार हे वर्षभर प्रयत्न करत होते. कुष्ठरोग्यांना हाताने स्वयंपाक करता येत नसल्यामुळे त्यांना तयार जेवण उपलब्ध होणे आवश्यक होते. विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ग्रामस्थांच्या गरजा समजुन घेऊन त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या वसाहतीत शिवभोजन थाळी मंजूर करण्यासंदर्भात कळविले. त्यांनतर येथील वसाहतीत शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. पुण्याचे  जिल्हा  पुरवठा अधिकारी यांनाही  यासंदर्भात निर्देश देण्यात आले.


      शिवभोजन  थाळी  सुरू करण्यात आल्यामुळे कुष्ठरोग्यांची मोठी सोय झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डेव्हिड वंगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले आहेत.


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..