लोकल सेवा तुर्तास नाहीच

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा तुर्तास नाहीच


- आयुक्त इक्बालसिंग चहल



मुंबई प्रतिनिधी : दिल्लीमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. तब्बल पाच महिन्यानंतर मुंबईत रुग्णसंख्या वाढली असून, दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या निर्णय आणखी लांबणीवर पडणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक मुलाखतीत बोलताना हे स्पष्ट केलं आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील कोरोना परिस्थिती विषयी माहिती दिली. मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर चहल यांनी चिंता व्यक्त केली आहे.


     महापालिका आयुक्त चहल म्हणाले, ”मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. मात्र, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. जलतरण तलाव (स्वीमिंग पूल), शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता या तिन्ही गोष्टी बंद राहतील. इतर ठिकाणावर सध्या कोणताही परिणाम होणार नाही, असं आयुक्त चहल म्हणाले...!


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..