विविध विषयांवर मोफत वेबिनार

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत विविध विषयांवर मोफत वेबिनारमुंबई प्रतिनिधी : दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर रोजी विविध विषयांवर मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.


1. सकाळी 10.00 वाजता डॉ. भावेश भाटिया आदर्श दिव्यांग उद्योजक यांचा प्रेरणादायी प्रवास


प्रमुख वक्ते- भावेश भाटिया  या वेबिनरचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/iFCARXwLpDo या लिंकचा वापर करावा.


2. दुपारी 1.30 वाजता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार तक्रार निवारण अधिकारी यांची भूमिका  याबाबत माहिती देण्याकरिता ॲड. उदय वारुंजीकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे . या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/mkGuto37nYg या लिंकचा वापर करावा, असे आवाहन दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..