डोंबिवली पश्चिम येथील २ इमारती जमीनदोस्त

पितृछाया १ व २ अतिधोकादायक इमारत आयुक्त यांच्या आदेशानुसार पडण्यात आलेल्या आहेत - ह प्रभागक्षेत्र अधिकारीकल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त  अनधिकृत बांधकाम नियंत्रण सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील कोपर गावातील ,शिवमंदिर रोडवरील सुमारे 48 वर्षे जुन्या अतिधोकादायक असलेल्या 2 इमारती (पितृछाया 1 व 2) या ह प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी ह प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाचे कर्मचारी, उप अभियंता यांच्या सहकार्याने आज निष्कासीत केल्या.
       या इमारती जीर्ण अवस्थेत होत्या परंतु मालकीबाबत वाद असल्यामुळे त्या अनेक वर्षे तश्याच पडून होत्या. सदर इमारतींच्या बाजूला वाहता रस्ता असल्यामुळे इमारती निष्कासीत करणेबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दोन्ही इमारतींना महानगरपालिके तर्फे अतिधोकादायक म्हणून यापूर्वीच नोटीस बजावण्यात आल्या होत्या. दोन्ही इमारतीमध्ये रहिवास नव्हता.


दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


 


🙏सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा🙏