कल्याण पश्चिमेकडील ७० वर्षे जुनी इमारत जमीनदोस्त

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यावर कारवाई करण्यात आली - विजय सूर्यवंशी आयुक्त



कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण :  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार,अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली, क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे व त्यांच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकातील कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने कल्याण मा. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ पोलिस स्टेशनजवळील पटेल भवन या सुमारे 70 वर्ष जुन्या G+1 पोटमाळा या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाच्या कारवाईस आज प्रारंभ केला . आजच्या कारवाईमध्ये सदर इमारतीमधील 6 गाळे व 2 रुमचे बांधकाम 1 जेसीबी व गॅसकटरच्या सहाय्याने  निष्कासित करण्यात आले. ही कारवाई उद्या दिवसभरही सुरू राहणार आहे. सदर इमारतीस अतिधोकादायक म्हणून महापालिकेने यापूर्वीच नोटीस बजावली होती. 

   ह प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी देखिल डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रोड वरील सुमारे 47 वर्ष जुनी सरस्वती सदन या G+4 अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाच्या कारवाईस आज प्रारंभ केला,सदर इमारतीस अतिधोकादायक म्हणून नोटीस बजविण्यात आली होती,या इमारतीत रहिवास नव्हता परंतु या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग शेजारील इमारतींच्या गाड्यांवर पडल्यामुळे तो भाग ब्रेकरच्या सहाय्याने तात्काळ पाडण्यात आला, सदर इमारत चिंचोळ्या भागात असल्याने ती कॉम्प्रेसर च्या मदतीने निष्कासित करण्यात येणार आहे

दिगंबर वाघ
                  कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा