कल्याण डोंबिवलीत घर घेताना खात्री करा !

केडीएमसीनं आणला नवीन टोल फ्री क्रमांक..18002337295

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांची संकब्या दिवसेंदिवस वाढत चाललीये. या बांधकामावर अंकुश ठेवणं महापालिकेच्या आवाक्याबाहेर असलं, तरीही आता ग्राहकांना मार आपण घेत असलेलं घर अधिकृत आहे की अनधिकृत, हे जाणून घेता येणार आहे. त्यासाठी केडीएमसीनं एक खास टोल फ्री क्रमांक तयार केला असून यामुळे घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होण्यापासून वाचणार आहे.

          कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत विशेषतः डोंबिवली, २७ गावं, टिटवाळा,कल्याण ग्रामीण,कल्याण पूर्व परिसरात अनधिकृत बांधकामांची संख्या मोठी आहे. फक्त चाळीच नव्हे, तर ७-७ मजल्यांचे टॉवर्सही अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत. या बांधकामांवर अंकुश ठेवणं महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेलंय. शिवाय या बांधकामांमध्ये घर घेऊन फसवणूक होणाऱ्या नागरिकांनाही नंतर मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळेच आता कल्याण डोंबिवली महापालिकेनं एक टोल फ्री क्रमांक जाहीर केलाय. तुम्ही जर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत घर घेत असाल, तर या क्रमांकावर फोन करून तुमचं घर, इमारत अधिकृत आहे की अनधिकृत हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतची माहिती दिलीये. यामुळे नागरिकांची फसवणूक होण्यापासून वाचणार असून साहजिकच अनधिकृत बांधकामांना आळा बसणार आहे. महापालिकेच्या या नव्या आयडियामुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे मात्र दणाणले आहेत.

दिगंबर वाघ             

       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


      🙏  एक वचन तीन नियम  🙏

  १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा