महाराष्ट्राला जिवन रक्षा व सुधारात्मक पदक प्रदान

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली प्रतिनिधी: दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील  ५९  व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परवानगीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२०’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार अनिल दशरथ खुले आणि  बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जाहीर झाला आहे.

       देशातील ५९ नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील एका व्यक्तीस .‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ हा  पुरस्कार  मरणोत्तर जाहीर झाला आहे.  देशातील आठ जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहे. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण ३१ जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.  

महाराष्ट्रातील तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक

      देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल  सुधारात्मक सेवा पदक प्रदान करण्यात येतात.

     देशातील 12 तुरुंग अधिका-यांची ‘राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदका’साठी निवड करण्यात आली आहे. तसेच 39 तुरुंग अधिकारी -कर्मचा-यांना  उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील तिघांचा  समावेश आहे. हवालदार सर्वश्री उत्तम विश्वनाथ गावडे, संतोष बबला मंचेकर आणि बबन नामदेव खंदारे यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’ जाहीर झाले आहे. एका कर्मचा-याला मरणोत्तर सुधारात्मक शौर्य सेवा पदक जाहीर झाले आहे



दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


  🙏  एक वचन तीन नियम  🙏

) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा