अर्थसंकल्प २०२१ आज संसदेत जाहीर होणार अर्थसंकल्प

कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटी- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली प्रतिनिधी : आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी यंदाच्या अर्थसंकल्प सादरीकरणाची तयारी पुर्ण केली आहे. कोरोना संकटामुळे रूतलेले अर्थचक्र हळूहळू सुरू झाले असले तरी ते वेगाने धावण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागले असून, कोरोनामंदीतून सावरण्याबरोबरच विकासवृद्धीची झेप घेण्याचे आव्हान आता सरकारपुढे आहे.

        लॉकडाऊनमुळे सरकारी तिजोरीसह सामान्यांचेही अर्थकंबरडे मोडले आहे. त्यामुळे विविध प्राप्तीकरातील सोयी-सवलती, भरघोस आर्थिक उपाययोजनांची मात्रा देऊन एकूणच अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्याची पावले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उचलावी लागणार आहेत. आरोग्यसेवेसाठी अधिभार आणि घरे-वाहने आणखी महाग करण्याबाबतची चिंता याबाबतची अनिश्चितता अर्थसंकल्पानंतर आज स्पष्ट होणार आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

       पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे. सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सभागृहात मांडणार आहेत.या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटी- निर्मला सीतारामन

      आज संसदेत २०२१ चा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी यंदाच्या अर्थसंकल्प सादरीकरणाची तयारी पुर्ण केली आहे. कोरोना संकटामुळे रूतलेले अर्थचक्र हळूहळू सुरू झाले असले तरी ते वेगाने धावण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे लक्ष लागले असून, कोरोनामंदीतून सावरण्याबरोबरच विकासवृद्धीची झेप घेण्याचे आव्हान आता सरकारपुढे आहे.

     अश्यात देशात सुरू असलेल्या कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी केली आहे.ही बाब सर्वसामान्य जनतेसाठी खरोखरचं दिलासादायक बाब आहे.

दिगंबर वाघ             

     कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


       🙏  एक वचन तीन नियम  🙏

   १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा