ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी ?

 ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करावी - उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई प्रतिनिधी : परिसरातील ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज असून ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आमदार मंगेश कुडाळकर यांनी नेहरु नगर, कुर्ला (पूर्व) येथे भोंग्यांच्या आवाजाने होत असलेल्या ध्वनी प्रदुषणाबाबत निवेदन सादर केले. यावेळी पर्यावरण विभागाचे संचालक नरेंद्र टोके, उपसचिव शु. द. आहेर, अतिरिक्त पोलीस आयुक्त,मुंबई प्रविण दराडे, पोलीस उपायुक्त विजय पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हर्षवर्धन आदी अधिकारी उपस्थित होते.

          कोरोना प्रादुर्भावाच्या समस्येमुळे ऑफिसची कामे, मुलांच्या ऑनलाईन शाळा, कॉलेज तसेच इतर कामे घरातुन केली जातात. परिसरात भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता अधिक असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होत आहेत. या समस्यांबाबत स्थानिक पोलीसांकडे बैठका घेण्यात आल्या. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,सर्व समाजातील सण-उत्सव सतत सुरु असतात. भोंग्यांना दिलेल्या परवानगीबाबत शहानिशा करून शहरात ध्वनी प्रदुषण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करावी. तसेच शांतता समिती बैठकीत सर्व समाजातील लोकांना विश्वासात घेऊन भोंग्यांचा आवाज नियमानुसार असावा यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ व पोलीस विभागाने तात्काळ  कार्यवाही करावी, असे निर्देश उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

        ध्वनी प्रदुषणासंदर्भात 10 मिनिटांचे सादरीकरण तयार करुन सर्व जनतेमध्ये जागृती करावी.न्यायालयाच्या निर्णयांचा अभ्यास करुन पोलीसांनी ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी  योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

दिगंबर वाघ             

       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


      🙏  एक वचन तीन नियम  🙏

 १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा