५० टक्के उपस्थित राहील. वसतिगृह बंदच राहतील
येत्या १५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील महाविद्यालयं होणार सुरू,उदय सामंतांची माहिती
मुंबई प्रतिनिधी : कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील महाविद्यालये येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना काळातील सर्व नियम लक्षात घेऊन विद्यापीठाने आपापल्या स्तरावर महाविद्यालये खुली करण्याचे नियोजन करावे,अश्या सूचनाही यावेळी उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
येत्या वर्षासाठी विद्यार्थ्यांना आपल्या ७५% हजेरीमध्ये सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उदय सामंत यांनी घेतला आहे.विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाइन घ्यायच्या की ऑफलाईन हे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर ठरवावे अश्या गाईडलाईन देखील जारी करण्यात आल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.सोबतच यंदाचा अभ्यासक्रम १५ टक्क्यांनी कमी करावा अश्या गाईडलाईनही जारी करण्यात आल्या आहेत.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
🙏 एक वचन तीन नियम 🙏
१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा