कोरोना (कोविड-१९) सुरू झाल्यापासून सुमित मल्लिक राज्य मुख्य माहिती आयुक्त कार्यालयात येत नसल्याचे उघड..
राज्य माहिती आयोग यांच्याकडे ६० हजार अधिक द्वितीय अपील सुनावणी च्या प्रतीक्षेत असून यासाठी आजपर्यंत सुनावणीसाठी कोणतीही कालमर्यादा कायद्यामध्ये देण्यात आलेली नाहीत म्हणून सुनावणी घेण्यासाठी असलेली यंत्रणा यामध्ये फारशी गंभीर नाहीत जेते सरकार येते ते आपल्या मर्जीतील व्यक्तींना येथे बसवते यामध्ये धक्कादायक प्रकार म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त असलेले सुमित मल्लिक हे कोरोना (कोविड-१९) सुरू झाल्यापासून कार्यालयात येत नाही असे कार्यालयातून अनेक नागरिकांना सांगितले जाते येथील अधिकारी कर्मचारी हेसुद्धा नागरिकांना जबाबदारीने माहिती देत नाही या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०४९१८४ या क्रमांकावर नागरिकांनी फोन केला असता कार्यालय फोन घेत नसल्याबाबत नागरिकांचे म्हणणे आहेत येथील आयुक्त हे अकार्यक्षम अधिकारी आहेत ? असा प्रश्न अनेक कार्यकर्ते विचारत आहेत.
विशेष म्हणजे कोरोना मध्ये शासनाने परिपत्रक काढून शासन परिपत्रक क्रमांक : समय २०२०/ प्र.क्र.३५/१८(र.व का.) दि. ०५ जुन २०२० रोजी परिपत्रक काढून ई-मेल आणि व्हाॅट्सअपचा वापर करावा असे कळविले होते.परंतु याउलट राज्य मुख्य माहिती आयोगातून सांगितले जाते की आम्ही ऑनलाईन कोणतेही काम करीत नाहीत. असे नागरिकांना सांगून नागरिकांची दिशाभूल केली जाते ऑनलाईन सुविधा आमच्याकडे बंद आहेत असे सांगून मुख्य माहिती आयोगाचे काम वाऱ्यावर सोडले आहेत. मुख्य माहिती आयुक्त हे कार्यालयात ? येत नाही याची उत्तरे नागरिकांना मिळत नाहीत यांना कामे होत नसेल तर मल्लिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे सामाजिक कार्यकर्ते सांगतात हे नियमबाह्य पद्धतीने येथे बसलेले आहेत आयोगाची स्थापना नागरिकांना न्याय देण्यासाठी झाली असून आयोगच न्याय देत नसेल तर या पवित्र पदाला यांच्यासारख्यानी अपवित्र केले आहेत.
आता तरी राज्यपालांनी याकडे लक्ष द्यावे व सुमित मल्लिक यांना कार्यमुक्त करावे जेणेकरून नागरिकांना वेळेमध्ये न्याय मिळेल आणि आयोगावर असलेला नागरिकांचा विश्वास असाच राहील व लोकशाही अधिक बळकट होईल या पदावर कार्यक्षम व कायद्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे योग्य व्यक्तीची नियुक्ती करावी अशी मागणी अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत राज्य मुख्य माहिती आयोग या कार्यालयाकडे माहिती घेण्यासाठी दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०४९१८४ वर फोन केला असता फोन घेतल्या जात नाहीत.
⚫ या कार्यालयामध्ये कमीत कमी १० ते १५ वेळेस फोन केला तेव्हा फोन घेतला आमच्या कार्यालयात ऑनलाइन कोणतीच सेवा दिली जात नाही आपण ऑफलाईन तक्रार, आर.टी.आय. काहीही पत्रव्यवहार करावा तसेच सुमित मल्लिक आयुक्त हे कोरोना (कोविड-१९) मुळे कार्यालयात येत नाही आपण कुठेही तक्रार करावी आम्हाला फरक पडत नाही अशी कार्यालयात उत्तरे दिली जातात. - दिगंबर वाघ कार्यकारी संपादक
⚫ मुख्य माहिती आयोगाने आपली कामाची पद्धत बदलावी व नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आम्ही राज्यपाल यांना याबाबत निवेदन देऊन सुमित मल्लिक यांना तात्काळ कार्यमुक्त करावे आणि जबाबदार व कायद्यानुसार येथे नियुक्ती द्यावी अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू .. - संजय हंडोरे संस्थापक अध्यक्ष कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई.
🙏 एक वचन तीन नियम 🙏
१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा