के.डी.एम.सी देणार आता डॉक्टर आर्मी सुविधा ?

महानगरपालिकेच्या सरकारी रूग्णालयात देखील खाजगी रूग्णालयासारख्या तज्ञ डॉक्टरांच्या सेवा सर्वसामान्य गरजू रूग्णांसाठी 1 मार्च 2021 पासून उपलब्ध !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कोविडच्या भीषण संकटात महापालिकेकडे अपुरी वैदयकिय सेवा उपलब्ध असताना इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच कॅम्पा, निमा व इतर वैदयकिय संघंटनांनी कोविड संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स आर्मी तयार करून अभुतपूर्व काम करीत कोरोनाची लढाई लढली व रूग्ण संख्येचा चढता आलेख कमी करून संपूर्ण राज्यात एक आदर्श निर्माण केला, त्यामुळे महापालिका प्रशासनाचे ,वैदयकिय विभागाचे या वैदयकिय संघटनांशी मेळ साधल्यामुळे एक अतुट नाते निर्माण झाले आहे आणि आता इंडियन मेडिकल असोसिएशनने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आवाहनाला अनुकूल प्रतिसाद देवून महापालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालय व शास्‍ञीनगर रूग्णालय या रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या सेवा सर्वसामान्य गरजू रूग्णांसाठी दि.1 मार्च 2021पासून उपलब्ध करून देण्यास सहकार्य केले आहे. 

         कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे बाई रूक्मिणीबाई रूग्णालय, शास्त्रीनगर रूग्णालय येथे खाजगी डॉक्टरांच्या पॅनलच्या माध्यमातून 1 मार्च 2021 पासून (OPD) बाहयरूग्ण विभागात दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत रूग्णांसाठी तपासणी सुविधा उपलब्ध होणार असून यामध्ये फिजीशियन, नेत्रचिकित्सा, शल्यचिकित्सा, नाक, कान, घसा, दंत चिकित्सा तपासणीसाठी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत रूग्णांसाठी तपासणी सेवा पुरविल्या जाणार आहेत. महानगरपालिकेच्या रूग्णालयात आता या सुविधांची उपलब्धता केल्यामुळे सर्वसामान्य गरजू रूग्णांना दिलासा मिळणार आहे.

 बाई रूक्मिणीबाई रूग्णालयात बाहय रूग्णालय विभागात (OPD)- 

1. फिजीशियनची तज्ञ सेवा बाई रूक्मिणीबाई रूग्णालयात बुधवार आणि गुरूवार उपलब्ध होईल.

2. नेत्रचिकित्सा (Opthalmist) ची तज्ञसेवा रूक्मिणीबाई रूग्णालयात सोमवार आणि शुक्रवार उपलब्ध होईल.

3 . शल्य चिकित्सा (Surgeon) ची तज्ञसेवा रूक्मिणीबाई रूग्णालयात बुधवार आणि शनिवार उपलब्ध असेल.

4. नाक,कान,घसा (ENT) ची तज्ञसेवा रूक्मिणीबाई रूग्णालयात सोमवार आणि शुक्रवार उपलब्ध असेल.

5. दंत चिकित्सा (Dental) ची तज्ञ सेवा रूक्मिणीबाई रूग्णालयात मंगळवार आणि शुक्रवार उपलब्ध असेल.

 शास्त्रीनगर रूग्णालयात बाहय रूग्णालय विभागात (OPD) - 

1. फिजीशियनची तज्ञ सेवा शास्‍ञीनगर रूग्णालयात शुक्रवारी उपलब्ध असेल.

2. नेत्रचिकित्सा (Opthalmist) ची तज्ञसेवा शास्‍ञीनगर रूग्णालयात मंगळवार आणि गुरूवारी उपलब्ध असेल.

3. नाक,कान,घसा (ENT) ची तज्ञसेवा शास्‍ञीनगर रूग्णालयात मंगळवार आणि गुरूवारी उपलब्ध असेल.

       या तज्ञ डॉक्टर सेवेचा लाभ रूग्णांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.

दिगंबर वाघ             

       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


      🙏  एक वचन तीन नियम  🙏

 १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा