महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेस हातभार लावणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा संपन्न !
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेस हातभार लावणाऱ्या महिलांचा आगळा वेगळा सत्कार समारोह महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या माध्यमातून पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात संपन्न झाला. यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आणि निर्माल्यापासून खत निर्मिती करणाऱ्या, अनेक उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या रूपाली शाईवाले, लहान मुलांना समवेत घेऊन प्लास्टिक संकलन करणाऱ्या आणि स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घेणाऱ्या डॉ. रुपिंदर कोर मुजरानी, घनकचरा प्रश्नावर ठिकाणी मार्गदर्शन करणाऱ्या पर्यावरण तज्ञ वैशाली तांबट, स्वच्छ डोंबिवली अभियानात सक्रिय सहभाग घेणाऱ्या आणि कोरोना काळात वेबिनार चे आयोजन करून जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सुरेखा जोशी, प्लास्टिक पिशवीला , कापडी पिशवीचा पर्याय देऊन महिलांच्या सहकार्याने दहा हजार पिशव्यांचे वितरण करणाऱ्या सक्षम नारी मंडळाच्या अध्यक्षा स्वाती मोहिते, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने इ कचरा, खत निर्मिती याबाबत विविध उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या बिर्ला विद्यालयातील प्राध्यापक डॉ. सोनल तावडे, डोंबिवली येथील गृहनिर्माण संस्थामध्ये , विवेकानंद संस्थेमार्फत जनजागृती करून सहा संस्थांमध्ये खत प्रकल्प राबवण्यात पुढाकार घेणाऱ्या आरती पाटील, आणि रामबाग परिसरात कचरा वर्गीकरण करण्यात पुढाकार घेणाऱ्या व गृहनिर्माण संस्थामध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करून खतनिर्मितीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या रेखा चौधरी व सीमा जैन तसेच महापालिकेच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
कोविडच्या काळातही महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेस हातभार लावणाऱ्या, यासाठी जनमानसात आपल्या कार्याद्वारे जनजागृती करणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यकुशल महिलांचा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचे हस्ते सत्कार केल्यामुळे त्यांना हुरूप मिळून त्यांच्या सेवाभावी कामात अधिक गतिशीलता येण्यास साहाय्य होणार आहे.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
🙏 एक वचन तीन नियम 🙏
१) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा