या १२ संस्थांनी शासकीय जमिनीचे भाडे थकवल्याप्रकरणी चौकशी सुरू ?

 नागपुरातील शासकीय जमिनीचे भाडे थकविल्याबाबत

12 संस्थांची चौकशी सुरू - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई प्रतिनिधी : नागपूर शहरात एक रुपया लीजवर शासनाकडून सामाजिक कामांसाठी जागा घेऊन ज्या बारा संस्थांनी शासकीय जमीनीचे भाडे थकविले आहे, त्यांची उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिली. नागपूर शहरातील शासकीय जमिनींचे भाडे संस्थांनी थकविल्याबाबत  सदस्य  प्रवीण दटके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.  शासकीय जमीनीचे भाडे थकविणाऱ्या बारा संस्थांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्यानुसार संबंधित संस्थांबाबत भाडेपट्ट्यातील अटी व शर्तीनुसार जमीन वापराबाबत तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

          मुंबईतील गोरक्षक मंडळाने गाय चरणसाठी जी शासकीय जमीन घेतली होती त्यामध्ये गैरप्रकार झाले असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल, असेही महसूल मंत्र्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

दिगंबर वाघ             

   कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


         🙏  एक वचन तीन नियम  🙏

   १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा