उद्या महात्मा फुले जयंतीदिनी
महात्मा फुले एक क्रांतिकारक महामानव या विषयाव
प्रसिध्द वक्ते डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’सुरु आहे. रविवारी ११ एप्रिल रोजी श्रीमंत कोकाटे हे सकाळी ११.०० वाजता व्याख्यान मालेचे २४ वे पुष्प गुंफणार आहेत. या विशेष व्याख्यानातून महात्मा फुले यांच्या महत्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला जाणार आहे. सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या विषयी
प्रसिध्द व्याख्याते आणि इतिहास संशोधक म्हणून डॉ.श्रीमंत कोकाटे सर्वपरिचीत आहेत. उच्चविद्या विभूषीत डॉ.कोकाटे यांनी महाराष्ट्र ,गोवा, कर्नाटक,दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्ये एकूण ३७०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापिठांसह विदेशातही त्यांची व्याख्याने झाली आहेत.
‘छत्रपती शिवाजी महाराज’,‘छत्रपती संभाजी महाराज’,‘खरा शिक्षकदिन’,‘लढा विचारांचा’आदी त्यांची १० पुस्तके प्रकाशित आहेत. १९१२ मध्ये पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे आयोजित महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.शिवाजीराव डिसले पुरस्कार, सम्राट राष्ट्रीय पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
रविवार, 11 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मीडिया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.