मेडिकल वेस्टचा कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या विठ्ठल हाॅस्पिटलला १०,००० दंड

कल्याण पूर्व येथील काटेमानेवाली नाक्याजवळील कै. प्रल्हाद शिंदे उड्डाण पुलाच्या बाजूला मोकळ्या जागेत मेडिकल वेस्ट टाकणा-या विठ्ठलकृपा हॉस्पिटलच्या डॉ. अरुण गायकवाड यांचेकडून रु.10,000/- चा प्रशासकिय अधिभार वसूल !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण-डोंबिवली परिसरात दैनंदिन कचरा उचलला जातो मात्र यामध्ये मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकला गेल्यास त्यापासून नागरिकांना अपाय होऊ शकतो, यास्तव महापालिकेच्या आरोग्य विभागाने सदर मेडिकल वेस्ट संबंधित हॉस्पिटल/क्लिनीक यांचेकडून संकलित करुन त्याचे शास्त्रोक्त पध्दतीने उंबर्डे येथील बायोमेडिकल‍ प्रकल्पावर विघटन करणे याकरीता एजन्सीची नियुक्ती केलेली आहे, असे असतांनाही कल्याण पूर्व येथील कै. प्रल्हाद शिंदे उड्डाण पुलाच्या बाजूला मोकळ्या जागेत मोठया प्रमाणात मेडिकल वेस्टचा कचरा टाकण्यात आल्याची माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे निर्देशानुसार 5/ड प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल, मुख्य आरोग्य निरिक्षक, प्रभारी आरोग्य निरिक्षक यांनी समक्ष पाहणी करुन संबंधित सदर मेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकणारे विठ्ठलकृपा हॉस्पिटलचे डॉ. अरुण गायकवाड यांचेकडून रु. 10,000/- इतका  प्रशासकिय अधिभार वसूल केला आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८