दुकानदांरानी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने अनेक दुकाने सील

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विविध प्रभागक्षेत्रात दुकाने सील करण्याची धडक कारवाई ! 

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आज आय प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक‍ शिंदे यांनी चिंचपाडा रोड येथील 1 इलेक्ट्रॉनिक्स दुकान व कपडयाचे 2 गोडाऊन सील केले.फ प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी 90 फिट रोड लगतचे सुरु असलेले 1 गादीचे दुकान व चोळेगांव ठाकुर्ली येथील 1 गादीचे दुकान आज सील केले. महापालिकेच्या नागरिकांनी नियमांचे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.
दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८