DSO यांना कोण पाठीशी घालीत आहेत पुणे की मुंबई ?

कविता नावंदे जिल्हा क्रीडा अधिकारी औरंगाबाद यांना तात्काळ निलंबित करा - दिगंबर वाघ सरचिटणीस कोकण विभाग पत्रकार संघ यांची मागणी अन्यथा उपोषण अटळ

औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबाद येथे जिल्हा क्रीडा अधिकारी असलेल्या कविता नावंदे (कविता माणिकराव निंबाळकर) यांची शासकीय कारकीर्द वादात राहिलेले आहेत यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्याचे काम केले आहेत आपल्या स्वार्थासाठी लोकप्रतिनिधींना हाताशी धरून हव्या त्या ठिकाणी बदल्या करून घेतल्या तसेच अनेक प्रकारचे गैरव्यवहार केले आहेत कमी कालावधीमध्ये यांच्या ४ चौकशा चालू असून सुद्धा या चौकशांचा अंतिम अहवाल शासकीय यंत्रणा ? जाहीर करीत नाही ज्यांच्याकडे नावंदे यांची चौकशी करण्याची जबाबदारी दिलेली आहेत त्या अधिकाऱ्यांनी यांच्याकडून आर्थिक देवाण-घेवाण केली आहेत ? किंवा या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहेत ? याची चौकशी होणे गरजेचे आहेत.

       औरंगाबाद येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून हजर झाल्या नंतर या कार्यालयात हजर का राहत नाहीत यांना येथील विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांचे अभय आहेत ? किंवा लोकप्रतिनिधीच्या नावाचा दुरुपयोग करतात अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यांची दैनंदिन उपस्थिती का देण्यात आली नाही यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपले मासिक वेतन घेतले आहेत.

      यांनी यांच्या शासकीय कारकिर्दीत अनेक गैरव्यवहार केल्यामुळे यांच्या ४ चौकशा चालू आहेत पण अंतिम अहवाल आजपर्यंत शासनाने जाहीर केलेला नाहीत तसेच अहमदनगर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी असतानी जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्यामुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला असल्याचे समजले आहेत कविता नावंदे यांचे पती सुभाष नावंदे यांची नियुक्ती ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये असतानी हे जिल्हा क्रीडा कार्यालय औरंगाबाद येथे कुणाच्या आदेशाने हस्तक्षेप करतात ? फक्त फोटो काढून मीडियामध्ये देण्यासाठी यांना येथे आणले जाते याचीही चौकशी होणे गरजेचे आहेत.

कोकण विभाग पत्रकार संघ यांच्या मागणी

१) नावंदे यांच्या ज्या ४ चौकशा चालु आहेत त्याचा अंतिम अहवाल तात्काळ ऑनलाईन टाकावा जोपर्यंत अहवाल जाहीर होत नाही तोपर्यंत नावंदे यांना तात्काळ निलंबित करावे.

२) अहमदनगर येथे कार्यरत असतानी जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्यानंतर यांच्यावर गुन्हा दाखल झाला मग आपल्या कार्यालयाने कोणती कारवाई केली.

३) यांची ११ऑगस्ट २०२० रोजी हिंगोली येथे बदली झाल्यानंतर लगेच २ सप्टेंबर २०२० रोजी औरंगाबाद येथे बदली कशी झाली यासाठी किती लोकप्रतिनिधींनी शिफारस केली होती किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कुणाचा दबाव होता ?

       🔊 आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आमचे उपोषण अटळ आहेत मग ते पुणे की मुंबई मंत्रालय कोठे करायचे याबाबत संघातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ठरवले जाईल आमचे म्हणणे शासनाने लक्षात घ्यावे अन्यथा कोरोना (covid-19) काळात आम्हाला उपोषण करण्यास आपले अधिकारी भाग पाडीत आहेत असे आम्ही समजून घेऊ  - संजय हांडोरे पाटील संस्थापक अध्यक्ष

     🔊 तुम्हाला दुसरे कोणतेच विषय नाहीत ? अशी कोणती तुमची पत्रकारिता आहेत अनेक मोठे विषय आहेत त्याकडे लक्ष दे मला काहीच होणार नाही.. - कविता नावंदे डी.एस.ओ. औरंगाबाद

🔊 नावंदे यांच्या चौकशीसाठी सर्व फाईल मंत्रालय येथे आहेत आमच्याकडे नाही. - आयुक्त क्रीडा विभाग पुणे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८