पोलीस अधीक्षक औरंगाबाद मोक्षदा पाटील यांचेकडून तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचेकडून सर्व मुस्लिम बांधवांना जाहीर आवाहन

पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण,  मोक्षदा पाटील  यांचेकडून तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा
औरंगाबाद प्रतिनिधी : गेल्या एक वर्षापासून औरंगाबाद ग्रामीण पोलीस दल कोरोना महामारी पार्श्वभूमीवर ग्रामीण जिल्ह्यात शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील जनतेने देखील पोलीस प्रशासनास सहकार्य केलेले आहे.कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर रमजान ईद अत्यंत साधेपणाने साजरी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या इसमांविरुद्ध  कठोर कारवाई करण्यात येईल याची देखील नोंद घ्यावी.

ईद साजरी करण्याबाबत शासनाने दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

1. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल.

2. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

3. रमजान ईद निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

4.  कोविड-१९ या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात फौ.दं.प्र.सं.कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

5.  रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

6.  धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.

7.  रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

8.  कोविड -१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. पोलीस प्रशासनास सहकार्य करून रमजान ईद साजरी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८