जातपंचायती विरोधात अभ्यास कमिटी तयार करण्यासाठी शिफारस करणार -उपसभापती डॉ निलम गो-हे
पोलिस यंत्रणेने पिडीतांशी संवेदनशिलतेने वागून सकारात्मकरित्या गुन्हे नोंदवावेत, अशा सूचना यावेळी केल्या जातपंचायतीने समांतर कायदे पद्धत वापरणे कायदेशीर नाही केवळ माफीवर त्यांची सुटका होणे हे चुकीचे आहे. जातपंचायतीमध्ये जास्तीत जास्त अन्याय हा महिलांवरच होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले. प्रबोधनाने मानसिकता बदलणे हे क्वचितच घडते. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय होणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सुरू केलेले काम व्यापक प्रमाणात कार्यरत ठेवणे गरजेचे आहे. कायद्याचा व्यापक प्रचार होऊन लोकचळवळ होणे महत्वाचे आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी सातत्याने काम करणे महत्वाचे आहे. यासाठी सामाजिक संस्था आणि कार्यकत्यांना.शासन स्तरावर सर्वोतोपरी सहकार्य असेल असेही डॉ. गो-हे यांनी सांगितले.नागरी हक्क संरक्षण अप्पर पोलिस महासंचालक विनय कोरगावकर यांनी पोलिस प्रशासन सदैव सहकार्याच्या भूमिकेत असून, कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासन सहकार्य करीत नसल्यास तक्रार करावी असेही कोरगावकर यांनी सांगितले.यावेळी प्रियांका राठोड,पल्लवी रेणके,अर्जुन डांगळे, लक्ष्मण गायकवाड,उत्तम कांबळे,डॉ गौड,कृष्णा चांदगुडे- यांनी आपले मत व अनुभव मांडले.