आनंद विश्व गुरुकुल येथे ऑक्सिजन बँक योजनेचा शुभारंभ
 ठाणे प्रतिनिधी : आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात पॅरामेडिकल अभ्यासक्रम आणि ऑक्सिजन बँक योजनेचा शुभारंभ ठाणे : सध्या राज्यभर होत असलेल्या ऑक्सिजनचा तुटवडा आणि अपुरी पडत असलेली वैद्यकीय यंत्रणा लक्षात घेता आज ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात पॅरामेडिकल अर्थात सहवैद्यकीय क्षेत्र अभ्यासक्रम तसेच ऑक्सीजन बँक योजनेचा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा . ना . एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला . ठाण्यातील तीन हात नाका स्थित आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात प्राथमिक शाळेपासून ज्येष्ठ रात्र महाविद्यालय , विधी महाविद्यालय , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत डिप्लोमा इन जर्नालिजम , बी . ए . इन जर्नालिजम असे वर्ग सुरु आहेत . यंदाच्या वर्षी जूनपासून पॅरामेडिकल अर्थात सहवैद्यकीय क्षेत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला . सदर अभ्यासक्रमाद्वारे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार असून , पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनीही याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे . सहवैद्यकीय क्षेत्रातील सर्टिफिकेट , डिप्लोमा , पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा , डिग्री या अभ्यासक्रमांद्वारे उज्वल करिअरची संधी उपलब्ध होणार आहे . सदर अभ्यासक्रम १० वी पास नंतर २ वर्षे तर १२ नंतर १ वर्ष असा आहे . या अभ्यासक्रमात १. सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी २. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी , पी . जी . डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी , ४. डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्नोलॉजी , ५ . डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्नोलॉजी ६. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नोलॉजी यांचा समावेश आहे . दरम्यान  यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डॉ . श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अर्थात शिवसेना       

     वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू कोविडग्रस्त रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजनेचाही शुभारंभ केला . ऑक्सिजन बँक योजनेद्वारे ऑक्सिजन प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना विशिष्ट कालावधीपर्यंत ऑक्सीजन कॉन्सट्रेटर पुरविण्यात येणार आहे . यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय , मंगला हायस्कूल शेजारी , कोपरी येथे ऑक्सीजन बँक योजनेचे व्यवस्थापक माऊली धुळगंडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे . याशिवाय अरविंद मांडवकर ( ठाणे ) ९ ८०७७७६०१० , राम राऊत ( कल्याण ) ८ ९ ०७७७६००४ , रविंद्र ननावरे ( डोंबिवली ) ८ ९ ०७७७६०१३ , प्रसाद सुर्यराव ( उल्हासनगर ) ८ ९ ०७७७६०१३ , ऋषिकेश देशमुख ( अंबरनाथ ) ८ ९ ०७७७६०१२ यांच्याशी संपर्क साधण्यास कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले आहे . या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे , महापौर नरेश म्हस्के , शिवसेना खासदार राजन विचारे , अशोक वैती , रवींद्र फाटक , आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाचे सचिव प्रा . डॉ . प्रदीप ढवळ , पॅरामेडिकलच्या प्राचार्या डॉ . पद्मिनी कृष्णा , को - ऑर्डिनेटर मयुरा गुप्ते , ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते , कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . सीमा हर्डीकर , प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैदेही कोळंबकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८