तुंगा व्हिलेज येथील मुंबई पब्लिक स्कुलचे लोकार्पण

तुंगा व्हिलेज येथील मुंबई पब्लिक स्कुलचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई प्रतिनिधी : मुंबईतील तुंगा व्हिलेज, कुर्ला पश्चिम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई पब्लिक स्कुलचे लोकार्पण पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार दिलीप लांडे, स्थानिक नगरसेवक अश्विनी माटेकर आदी उपस्थित होते.

  यावेळी ठाकरे म्हणाले, मुंबईत सीबीएसई अभ्यासक्रमाच्या २४ शाळा सुरू होत आहेत. या शाळांमधून दर्जेदार आणि मोफत शिक्षण दिले जाणार असल्याने याचा सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना लाभ होईल याचा आनंद आहे. अजूनही कोविड ची परिस्थिती पूर्ण आटोक्यात आली नसल्याने सर्वांनी त्याबाबतचे नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमानंतर ठाकरे आणि महापौर  पेडणेकर यांनी या परिसरातील मिठी नदीचा भाग व सांडपाणी व्यवस्थापनाची पाहणी केली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८