कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

पुणे विभागातील 16 लाख 75 हजार 379 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित  17 लाख 58 हजार 218 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रतिनिधी : पुणे विभागातील 16 लाख 75 हजार 379 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 लाख 58 हजार 218 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 46 हजार 330 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 36 हजार 509 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा : पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 61 हजार 881 रुग्णांपैकी  10 लाख 33 हजार 433 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 474 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.32 टक्के आहे.

सातारा जिल्हा : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 1 हजार 660 रुग्णांपैकी  1 लाख 87 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 667 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 66 हजार 845 रुग्णांपैकी 1 लाख 59 हजार 717 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 696 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा : सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 1 लाख 54 हजार 782 रुग्णांपैकी  1 लाख 40 हजार 838  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 713 आहेत.  कोरोनाबाधित एकूण 4 हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 73 हजार 50 रुग्णांपैकी 1 लाख 54 हजार 266 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 780 आहेत. कोरोनाबाधित एकूण  5 हजार 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ : कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 485 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 294, सातारा जिल्ह्यात 1 हजार 162, सोलापूर जिल्ह्यात 405, सांगली जिल्ह्यात 984  तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 640 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण : पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 283 आहे. पुणे जिल्हयामध्ये 976, सातारा जिल्हयामध्ये 590, सोलापूर जिल्हयामध्ये 200, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 120 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 397 रुग्णांचा समावेश आहे.

विभागातील लसीकरण प्रमाण : पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 45 लाख 20 हजार 282, सातारा जिल्ह्यामध्ये 9 लाख 80 हजार 257, सोलापूर जिल्हयामध्ये 7 लाख 74 हजार 602, सांगली जिल्हयामध्ये 9 लाख 27 हजार 337 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 13 लाख 72 हजार 888 नागरिकांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण : आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 13 लाख 10 हजार 292 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 17 लाख 58 हजार 218 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८