महाराष्ट्रातील जावडेकर व धोत्रे यांच्यासह १० मंत्र्यांना डच्चू
दिल्ली प्रतिनिधी : दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या विस्ताराच्या मंत्रिमंडळात देशासह महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ नेत्यांचा समावेश केला जाणारा आहे. नव्या विस्तारात अनेक बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंदर प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजिजू, राजकुमार सिंह, हरदीपसिंह पुरी, मनसुख मंडविया, आदी दिग्ग्जांची नावे या यादीत आहेत.
आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहे, ही संख्या वाढून 81 होणार आहे. हर्षवर्धन यांचे खातेबदल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या खात्यात बदल होणार असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात हर्षवर्धन यांना अपयश आल्याने त्यांच्याकडून आरोग्य खातं काढून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. आरोग्य खात्याची जबाबदारी अनुभवी नेत्याकडे देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं.
या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश
नारायण राणे -- सुक्ष्म लघुउद्योग आणि माध्यम उघोगमंत्री
कपिल पाटील --- पंचायत राज राज्यमंत्री
डॉ. भागवत कराड--- अर्थ राज्यमंत्री
डॉ. भारती पवार --आरोग्य कुटुंबकल्याण राज्यमंत्री
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
रामचंद्र प्रसाद सिंग
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरेन रिजीजू
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेन्द्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी. किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
अनुप्रिया सिंह पटेल
डॉ. सत्यपाल सिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंडलाजे
भानूप्रताप सिंग वर्मा
दर्शना विक्रम जरदोष
मीनाक्षी लेखी
अनपुर्णा देवी
ए. नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी. एल. वर्मा
अजय कुमार
चौहान देवूसिंह
भागवत खुपा
प्रतिमा भौमिक
डॉ. सुभाष सरकार
डॉ. राजकुमार सिंह
बिस्वेश्वर तडू
शंतनु ठाकूर
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बरला
डॉ. एल. मुरगन
निसित प्रमाणिक
या मंत्र्यांना डच्चू
रमेश पोखरियाल निशंक
संतोष गंगवार
देबोश्री चौधरी
संजय धोत्रे
बाबुल सुप्रियो
प्रकाश जावडेकर
सदानंद गौड़ा
रतन लाल कटारिया
प्रताप सारंगी
डॉ हर्षवर्धन
अश्विनी चौबे
थावरचंद गहलोत