मोबाईलवर कसे बोलायचे किती बोलावे याच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई प्रतिनिधी : मोबाईल वापराबाबत काही वेळा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित शिष्टाचार पाळले जात नाही अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होते असे सांगत मोबाईल वापराच्या शिष्टाचारबाबतच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केल्या.कार्यालयीन कामकाजासाठी कॉल करायचा असल्यास लॅडलाईनला प्राधान्य द्यावे. कार्यालयीन वेळेत आवश्यक असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करावा मोबाईलवरून बोलताना सौजन्यपुर्ण भाषेचा वापर करावा तसेच असासंदीय भाषेचा वापर करू नये. त्यांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी तसेच टेक्स्ट मेसेजचा वापर करावा.कामासाठी बोलायचे असेल तर कमीतकमी वेळेत बोलावे.
मोबाईल व्यग्र असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन काॅलला तात्काळ उत्तर द्या. मोबाईलवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे आणि भाषेचे तारतम्य बाळगा. आवश्यक वैयक्तिक कॉल कक्षाच्या बाहेर जाऊन करावेत असे बजावण्यात आले आहे.
दौऱ्यावर असताना मोबाईल बंद ठेवू नयेवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात असताना आपला मोबाईल व्हायब्रेशनवर ठेवा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान मोबाईल तपासणे मेसेजेस तपासणे हेडफोन वापरणे टाळावे. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना मोबाईल बंद ठेवू नये असे स्पष्ट करण्यात आले.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८