महापालिकेच्या आय व ई प्रभागात अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : आय प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे, ड प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल आणि ई प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी संयुक्तपणे विभागीय उपआयुक्त अनंत कदम यांचे समक्ष उपस्थितीत आय प्रभागातील विकासक राम अवतार यादव यांचे तुकाराम चौक, दावडी येथे सुरु असलेल्या G+3 या अनधिकृत इमारतीच्या बांधकामाचे निष्कासनाच्या धडक कारवाईस आज सुरुवात केली. ही कारवाई महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी/कामगार, महापालिका पोलीस कर्मचारी, मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व 1 जेसीबी, 1 पोकलेन मशिन, 2 ब्रेकर मशिन यांच्या मदतीने आज दिवसभरात करण्यात येणार आहे.

          त्याचप्रमाणे ई प्रभागातही नांदीवली टेकडी येथील अनधिकृत 11 शेड व 2 टप-या तसेच 1 फुटींगचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई प्रभागक्षेञ अधिकारी भारत पवार यांनी 1 जेसीबी, 10 कामगार व महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने केली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८