वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पद भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई प्रतिनिधी :  सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.  भरती प्रक्रिये दरम्यान अर्ज सादर करण्याची मुदत  १८ फेब्रुवारी २०२ रोजी रात्री ११.५९ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी असे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.याआधी अर्ज सादर करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत होती.

 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या एकूण १७२९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ ची १७२९ रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती प्रक्रिया सुरु आहे. आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सविस्तर जाहिराती बघण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी मुदतवाढीची सूचना संकेतस्थळावरही आहे, याची नोंद घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८