ग्लोबल गोल्ड आयडियल शिक्षिका पुरस्कार २०२१ रूचिता राजेद्र बोलाडे यांना प्रदान !
रुचिता बोलाडे यांना यापुर्वी आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कार-२०१७ तसेच गुरुगौरव पुरस्कार, कार्यशील शिक्षिका पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कारासह विविध संस्था/प्रतिष्ठान लायन क्लबचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शिक्षणासह सांस्कृतिक विभागातही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. शालेय, सहशालेय, आंतर शालेय, जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय विविध स्पर्धांना विद्यार्थी तयार करणे व स्वःताही सहभागी घेणे यामध्ये रुचिता बोलाडे कायमस्वरुपी अग्रस्थानी असतात. संस्थेच्यावतीने दरवर्षी शिक्षण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.रुचिता बोलाडे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, युवक मंडळ व सर्व कु.स.संघ शाखांसह अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.