ब आणि ई प्रभाग क्षेत्रात पदपथांवरील अतिक्रमणे निष्कासनाची धडक कारवाई !

कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार नागरिकांना पदपथावरुन चालणे सोयीचे व्हावे या दृष्टीकोनातून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार  चंद्रकांत जगताप-सहा. आयुक्त,ब प्रभाग यांनी डी. बी. चौक ते उंबर्डे रोडवरील फूटपाथवरील 15 शेड, 5 चिकन दुकानाचे शेड तसेच 10 हातगाड्या हटविण्याची धडक कारवाई आज केली,त्याचप्रमाणेआयुष हॉस्पिटल येथील 3 अनधिकृत पत्र्याचे गाळे व रिंग रोडवरील 3 टप-या हटविण्याची  कारवाई केली.सदर कारवाई महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे 10 कर्मचारी, महापालिकेचे 10 पोलिस कर्मचारी तसेच 1 जेसीबी व 1 डंम्पर यांचे मदतीने करण्यात आली.

     ई प्रभागातही सहा. आयुक्त भारत पवार यांनी त्यांच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी आणि महापालिकेचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने मानपाडा क्रॉस रोड ते नांदीवली  पर्यंत आठवडा बाजारातील टपऱ्या, फेरीवाले हटविण्याची कारवाई केली. यामध्ये त्यांनी 68 शेड, 11 टपऱ्या,15 हातगाडया, 5 गाळ्यांचे जोते  यावर आज 1 जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली.अ प्रभागातही  सहा. आयुक्त राजेश सावंत आणि  त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आज आंबिवली रेल्वे स्टेशन ते मोहना मार्केट परिसरात 100 फेरीवाल्यांवर कारवाई करत परिसर मोकळा केला,  यापुढेही सदर कारवाई दररोज सुरू राहणार आहे.

ॲड.दिगंबर वाघ.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८