कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन
मुंबई प्रतिनिधी : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने, २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर 2021 या कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४ दूरध्वनी क्रमांक 022-24921212 वेबसाईट acbmaharashtra.gov.in ईमेल - acbwebmail@mahapolice.gov.in/ addlcpacbmumbai@mahapolice.gov.in फेसबुक - www.facebook.com-maharashtra-ACB मोबाईल ॲप - www.acbmaharashtra.net ट्वीटर - @ACB_Maharshtra व्हॉट्सॲप - 9930997700 येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी अशी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली आहे.