दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राज्यभरात व्यापक स्वरुपात राबविणार -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की दिव्यांग हक्क अधिनियम, 2016 नुसार सर्व 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यभरात विशेष प्रयत्न केले जाणार असून यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग संपूर्ण सहकार्य करेल. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करतील. महाराष्ट्रातील दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असून यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे असे यावेळी खासदार सुळे यांनी सांगितले.
या अभियानामुळे राज्यस्तरावरील दिव्यांगांसाठी विविध वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना कार्यान्वित करणे सोयीचे होईल. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणे विविध प्रोत्साहनपर योजना राबविणे विविध प्रकारचे साहित्य साधने आणि उपकरणांचा पुरवठा करणे सोयीचे होणार आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील सवलती मिळणे याबरोबरच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.