महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ५ आयुक्तांना शपथ

हाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली नवीन ५ आयुक्तांना शप

मुंबई प्रतिनिधी : सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेअन्वये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिक  पुणे नागपूर औरंगाबाद आणि अमरावती या महसुली विभागांकरिता राज्य सेवा हक्क आयुक्तांची  नियुक्ती केली आहे. या 5 आयुक्तांना नवीन प्रशासकीय इमारती मधील आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी शपथ दिली.

    चित्रा विकास कुलकर्णी यांची आयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक महसुली विभाग   दिलीप मोहनराव शिंदे आयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग  अभय बुद्धदेव यावलकर आयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोग नागपूर महसुली विभाग  डॉ. नरुकुल्ला रामबाबु, आयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोग अमरावती महसुली विभाग आणि डॉ. किरण दत्तात्रेय जाधव यांनी आयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयोग औरंगाबाद महसुली विभागात राज्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून शपथ घेवून राज्य लोकसेवा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

शपथविधीनंतर मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय म्हणाले महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तीना पारदर्शक कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता, तसेच शासकीय विभाग अभिकरणे व इतर सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंमलात आलेला आहे. अधिनियमाच्या कलम १३ पोट नियम-२ अन्वये प्रत्येक महसुली विभागासाठी एक राज्य सेवा हक्क आयुक्त नियुक्त करण्याची तरतूद आहे. त्यानुसार  पाच आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.महसुली विभागातील आयुक्तांच्या नेमणुकीमुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित होईल तसेच अधिनियमाने निश्चित केलेल्या उद्देशांना चालना मिळेल असा विश्वास मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८