कविता नावंदे यांनी अहमदनगर नंतर औरंगाबादमध्ये केला अनेक कोटीचा घोटाळा ?

रंगाबाद मध्ये घोटाळ्यात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त हे ही सहभागी आहे ?

रंगाबाद प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची कारकीर्द वादग्रस्त अस्थानी सुद्धा यांच्यावर  कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही उच्च न्यायालयाचा सुद्धा यांनी अवमान केला आहेत विभागीय क्रीडा संकुलात आपल्या कार्यालयाची दुरूस्ती करण्यासाठी कुणाची परवानगी न घेता काम करण्यात आले यासंबंधीचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असतानी सुद्धा यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मदत केल्याचा आरोप होत आहेत ? यांना ज्या-ज्या ठिकाणी नियुक्ती दिली त्या-त्या ठिकाणी यांनी घोटाळे केले आहेत अहमदनगर येथील घोटाळ्याची विधानसभेत चर्चा झाली होती त्यावेळी तत्कालीन पुण्याचे आमदार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता  याचप्रमाणे औरंगाबाद मध्येही घोटाळे सत्र सुरु.

    पुन्हा एकदा अनेक कोटीं रुपयेचा मोठा घोटाळा समोर येण्याचे चिन्ह दिसत आहे जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये व्यायाम शाळा साहित्य वितरणात गैर व्यवहार झाल्याचा आरोप पुण्याच्या एका तक्रार दाराने क्रीडा मंत्रालयाकडे केल्यानंतर त्याची तातडीने बैठक बोलावून क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दाखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. यांनी आपल्या क्रीडा मंत्र्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये गृहीत धरून कोणतीही पुर्व सुचन न देता नाव टाकले या स्वतः हा काय समजतात यांना क्रीडा मंत्रालयातील कोणी पाठी राखा आहेत ? निलंबित का होत नाही. यांनी विद्यामान लोकप्रतिनिधी यांच्यावर विश्वास नसावा म्हणून माजी लोकप्रतिनिधी यांच्या बैठका सुट्टीच्या दिवशी घेतात तसेच कविता नावंदेची खातेनिहाय  चौकशीसाठी इतर विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश का होत नाही जेणेकरून यामध्ये पारदर्शक येईल चौकशी सुरु होती न होती पुन्हा चौकशीसाठी तीन सदस्य समिती आज शुक्रवारी शहरात दाखल होत आहे दुसरीकडे शहरातील मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या निधीतून खर्च झालेल्या एक कोटी रुपयांचे क्रीडा साहित्य खरेदीबाबतचा हिशोब क्रीडा अधिकारी नावंदे यांच्याकडून मागवल्याचे लेखी पत्र पाठवले आहे .

तक्रारीवर क्रीडा व युवक संचालयाने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी चौकशी समिती नियुक्त केली हि समिती ३-६ डिसेंबर या कालावधीमध्ये प्राथमिक चौकशी करणार आहे.  

    जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध संस्था ग्रामपंचायती व्यायामशाळा साहित्याचे वितरण करण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याची तक्रार पुणे येथील श्याम राजाराम भोसले यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यासह क्रीडा आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. क्रीडा व युवक संचालयाने उपसंचालक अनिल चोरमले यांनी चौकशीचे आदेश दिले आहे यामध्ये स्वतः अनिल चोरमले उर्मिला मोराळे उपसंचालक औरंगाबाद विभाग आणि सुहास पाटील उपसंचालक पुणे चौकशीसाठी औरंगाबाद मध्ये दाखल होणार आहे यापूर्वी यांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे . 

हे सर्व कुणाच्या आशीर्वादाने क्रीडा विभाग की अन्य कोण ?

 १) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर तात्काळ वर्तणूक प्रमाणपत्र द्यावे लागते यांनी आजपर्यंत ? दिले नाही.

२) अनुभव प्रमाणपत्र ही बनावट आहेत ?

३) स्वयंसिद्धी असोसिएशन महाराष्ट्र पुणे या संस्थेच्या नावाने सातारा येथे विविध विकास कामे नांवदे यांनी कसे घेतले.

४) १०२०/प्र.क्र.५३/क्रीयुसे-२ दि. ९ मार्च २०२१ अन्वये विभागीय चौकशी सुरू आहेत परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई किंवा निलंबन ? झाले नाहीत.

५) अहमदनगर येथे कोटी रुपयांचे घोटाळे केल्यानंतर एक FIR दाखल झाल्यानंतर यांची बदली हिंगोली येथे झाली.

६) क्र. आस्थापना/जिक्रीअ/बदली/२०२०/का-१ दि.सप्टेंबर २०२० अन्वये राजकीय वजन वापरून औरंगाबाद .

७) विभागीय क्रीडा संकुल येथील उच्च न्यायालयात एक सुमोटो याचिका दाखल असताना ही यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयची दुरुस्ती कुणाच्या आदेशांनी केली ?

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८