आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात व्यावसायिक पुस्तका पलीकडचे

नंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात उद्योजक प्रशांत सपकाळ यांची मुलाख

ठाणे प्रतिनिधी : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाने 'व्यावसायिक पुस्तका पलीकडचे' या उपक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक 'प्रशांत कॉर्नर' या मिठाई उद्योगाचे सर्वेसर्वा  प्रशांत सपकाळ यांच्या मुलाखतीचे आयोजन केले. यावेळी कॉमर्स आणि मॅनेजमेंट विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. आदित्य दवणे यांनी यांनी मुलाखतकाराची भूमिका बजावली.

    बालपणातील संघर्ष प्रशांत कॉर्नर या व्यवसायाचे नामकरण शिकत यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास समजावून सांगताना प्रशांत सपकाळ यांनी विद्यार्थ्यांतील भावी उद्योजकांना व्यवसाय करण्याचा गुरुमंत्र दिला. ते म्हणाले व्यवसायात स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे झटणं महत्वाचं आहे. व्यवसायात गुणवत्ता सारं काही असते ती राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कुठल्याही व्यावसायिकाने प्रयत्न करावेत. त्याचसोबत प्रशांत सपकाळ यांनी प्रशांत कॉर्नर या त्यांच्या व्यवसायात कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाते, नवनवीन पदार्थ समाविष्ट करण्यासाठी कशाप्रकारे संशोधन केले जाते अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. आयुष्यात संघर्षाचे स्थान मोठे आहे आपल्याकडे अधिक आहे ते इतरांना द्यावे चुकांतून हार न मानता शिकत जावे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

    'व्यावसायिक पुस्तका पलीकडचे' या उपक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते प्राध्यापक सचिन आंबेगावकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार समन्वयक प्रा. विनायक जोशी यांनी मानले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८