व्यावसायिकांनी किसान क्रेडिट कार्ड कर्जसुविधांचा लाभ घेऊन व्यवसाय व्रुध्दी करावी एम.बी.केंद्रे यांचे आवाहन
यावेळी पशु संवर्धन अधिकारी धस म्हणाले की चार औषधीसाठी एका गायीवर बारा हजार रुपये कर्ज किसान कार्ड योजने अंतर्गत दुग्ध व्यावसायिकांना देण्यात येत आहेत. व्यावसायिकांनी रितसर प्रस्ताव सादर करावेत.यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख चंद्रकांत लाडे यांनी मागणी केली की ज्याप्रमाणे
शेतकऱ्यांना शेतीवर कर्ज उपलब्ध होते त्याच पद्धतीने मत्स्य व्यावसायिकांनाही विनातारण कर्ज पुरवठा करण्यात यावा.
या प्रसंगी उंबरखेडा सोसायटीचे चेअरमन नारायण पवार पोपट मोरे महादू चव्हाण रशीद पठाण चेअरमन गंगाराम वानखेडे म्हस्के नाना रोठे सचिन पवार किशोर पवार विजय बनसोडे दिपक बिरोटे भावलाल बिरोटे पंकज बावने अंबादास बनसोडे दिपक आखाडे रामदास शिंदे कासाहेब गावंडे उमेश चव्हाण कारभारी खुर्दे कैलास लाडे सागर लाडे राजू वानखेडे आदिंसह तालुक्यातील बावीस मत्स्य सहकारी संस्थांचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्ताविक चंद्रकांत लाडे यांनी केले. आभार अनिता लाडे यांनी मानले. छायाचित्र:कन्नड तालुक्यातील मत्स्य दुग्ध व्यावसायिकांसाठी औरंगाबाद सहाय्यक आयुक्त कार्यालय,मत्स्य विभाग औरंगाबादच्या वतीने चर्चा सत्र कँम्प घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी एम. बी.केंद्रे दिगंबर महाडिक टी.बी.भोजने मनिषा हराळ चंद्रकांत लाडे व अधिकारी ..