मायसिटी फिटसिटी ही महापालिका आयुक्तांची संकल्पना

मायसिटी फिटसिटी ही महापालिका आयुक्तांची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी टीम वर्कची आवश्यकता आहे ! मनपा मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे 

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : "मायसिटी फिटसिटी" ही महापालिका आयुक्तांची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी टीमवर्कची आवश्यकता आहे, असे उद्गार महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी नुकतेच काढले.कल्याण-डोंबिवली नगरी ही खेळाडूंची नगरी म्हणून ओळखली जावी यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या वर्षीच्या अंदाजपत्रकात "मायसिटी फिटसिटी" असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महापालिका क्षेत्रातील जुन्या खेळाडूंना, उदयोन्मुख खेळाडूंसाठी, सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात भरीव अशी तरतूद केली आहे, यामध्ये खेळाडूंच्या/ नागरिकांच्या आरोग्य व क्रीडा गुणांचा विकास होण्यासाठी महापालिका क्षेत्रामध्ये किमान 50 कबड्डी कोर्ट, 3 फुटबॉल, 5 क्रिकेट, 25 व्हॉलीबॉल 10 खो-खो मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने क्रीडा धोरण राबवून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत महापालिकेत कार्यरत असलेल्या, विविध क्रीडा प्रकारात यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर नैपुण्य मिळवलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना समवेत आयोजिलेल्या बैठकीत बोलताना लेखा व वित्त अधिकारी उबाळे यांनी वरील उद्गार काढले.

    बैठकीत उपस्थित असलेल्या कर्मचारी वर्गाकडून/ क्रीडापटूं कडून, त्यांच्या अडचणी त्यांनी या बैठकीत जाणून घेतल्या आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करायचे आश्वासन दिले. आता सर्व खेळाडूंनी एकत्र येऊन इतिहास घडवायला तयार रहा या शब्दात उपस्थित क्रीडापटूंना त्यांनी प्रोत्साहित केले. सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार उद्याने, मैदाने, क्रीडांगणे व तलाव सुशोभीकरण याकरिता महसुली खर्चाअंतर्गत रुपये 10.10 कोटी व भांडवली खर्च अंतर्गत रुपये 10.70 कोटी अशी तरतूद करण्यात आलेली आहे, आयुक्तांच्या संकल्पनेनुसार बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ इ. खेळांची सुविधा असलेले एक अत्याधुनिक क्रीडा संकुल खंबाळपाडा येथे  उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सचिव संजय जाधव यांनी या बैठकीत दिली. यापूर्वी खेळांसाठी अधिकाऱ्यांची कमिटी गठित होत होती आता खेळाडूंना विश्वासात घेऊन त्यांची कमिटी गठित होईल आणि महापालिकेत कार्यरत असलेल्या खेळाडूंनाच नव्हे तर महापालिकेच्या शाळांमधील मुलांच्या क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे ते पुढे म्हणाले.

    महापालिकेचे क्रीडा धोरण अंमलात आणण्यासाठी महापालिकेने आम्हा खेळाडूंना विश्वासात घेऊन एक प्रकारे नवसंजीवनी दिली आहे अशा प्रतिक्रिया या बैठकीस उपस्थित असलेल्या महापालिकेतील क्रीडापटूंनी व्यक्त केल्या.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८