गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई  प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजास भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले.यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोनल शहा खासदार मनोज कोटक आमदार ॲड.आशिष शेलार चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते.यावेळी ट्रस्टच्यावतीने केंद्रीय मंत्री  शहा यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री शहा यांनी लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला.मुंबईसह राज्यभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे यंदाचे ८९ वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री.राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवास भेट ५२ फुटी पशुपतिनाथ मंदिर देखाव्याचे कौतुक

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सवास भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. दरवर्षी विविध मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या या मंडळातर्फे यावर्षी काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ५२ फुट उंच प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्याचे केंद्रीय मंत्री शाह यांनी कौतुक केले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पुनम महाजन आमदार ॲड.आशिष शेलार आमदार चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री विनोद तावडे आदी यावेळी उपस्थित होते.

    आमदार ॲड. आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे २७ वे वर्ष असून, या मंडळामार्फत दरवर्षी एका प्रसिद्ध मंदिराची आरास केली जाते. मागील वर्षी केदारनाथ मंदिर साकारण्यात आले होते.तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. गणेशोत्सव मंडळामार्फत धार्मिक उत्सवाबरोबरच अनेक वैद्यकीय तसेच सामाजिक सांस्कृतिक उपक्रमही राबविण्यात येत असून आरोग्याबाबतचे आवश्यक ते सर्व नियमही पाळले जात असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८