मुंबई प्रतिनिधी अरुण पाटील : शिर्डी येथील साई बाबांचा महिमा आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही पसरली असून देश परदेशातून भाविक साई चरणी येऊन दान - देणग्या देत असतात. अशाच प्रकारे आपल्या देशातील सर्वात श्रीमंत साईभक्त असलेले अनंत अंबानी यांनी दिपावली निमित्ताने शिरडी येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला १ कोटी ५१ लाख रुपायांची देणगी दिल्याची माहिती साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
अंबानी कुटुंबीय शिर्डी साईबाबांचे परमभक्त आहेत. अंबानी कुटुंबीय नेहमी साईबाबांच्या चरणी मोठे दान देत असतात.दिपावली निमित्ताने अनंत अंबानी यांनी शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांनी साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती करत पाद्य पूजा केली. साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी अनंत अंबानी यांचा साई शॉल व साई मूर्ती देवुन सत्कार केला आहे.
उद्योगपती अंबानीचे सर्व कुटुंब हे साईभक्त असून नेहमी साई दर्शनाला येत असतात. यापूर्वीही नीता अंबानी यांनी शिर्डीला भेट देऊन साई संस्थांनला वेगवेगळ्या स्वरूपात देणगी दिली आहे.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८