कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कचरा रस्त्यावर फेकल्यास दंड वसूल करणार..

रस्त्यावर कचरा टाकणा-या आस्थापनांकडून/दुकानांकडून रु७३००/- दंड वसूल ! 

ल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण  : दिपावली पूर्वी कल्याण डोंबिवलीतील सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याकरीता 24 तास ऑनफिल्ड काम करण्याबाबत सूचना महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिल्या होत्या,त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे समवेत घनकचरा विभागाचे उपआयुक्त यांनी कल्याण डोंबिवली परिसरातील स्वच्छतेची अचानक पाहणी केली असता शहरातील विविध ठिकाणी कचरा उचलण्यात आल्याचे निदर्शनास आले परंतु कचरा उचलल्यानंतर लगेचच कचरा टाकण्यात आल्याचे दिसून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.दांगडे यांनी दिले होते त्याअनुषंगाने उप मुख्य स्वच्छता अधिकारी  आणि स्वच्छता अधिकारी खिस्मतराव यांनी शोध घेवून

रामदेव हॉटेल, कल्याण (प.) यांस रु. 1000/- 

पादुका स्टोअर्स, कल्याण (प.) यांस रु. 3000/- 

अमोल गुंजाळ, एकवीरा हॉटेल जवळ, कल्याण (प.) यांस रु. 300/- 

किंजल स्टोअर्स, कल्याण (प.) यांस रु. 3000/- 

याप्रमाणे एकूण रु. 7300/- दंडा‍त्मक वसूली करण्यात आली. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अति‍.आयुक्त मंगेश चितळे यांचे मार्गदर्शनाखाली यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८