औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पैठणमधील गैरव्यवहार आहे ? -अनिता वानखडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

रंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान  भुमरे यांच्या मतदारसंघातील हा प्रकार असून पैठण तालुक्यातील पाझर तलावाचे ७ कामे मंजूर  1) दरेगाव २)  अब्दुल्ला पुर तांडा ३) धुपखेडा  ४) ब्राह्मण गाव  ५) सुंदरवाडी ६) तुपेवाडी शिवगडतांडा ७) आलियाबाद ही कामे जिल्हा जलसंधारण मृदु व जलसंधारण  विभाग औरंगाबाद येथून मंजूर करण्यात आली असून एकुण १ कोटी ३० लाखांच्यावर असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहेत. 
   असे कार्यारभं आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे यामध्ये मी ही सर्व कामे निकृष्ट बोगस केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनिता वानखडे वतीने निवेदन दिल्यानंतर  या सर्व कामांचे वर्क ऑर्डर प्रमाणे काम करुन घेऊनच बिले अदा केली जातील  असे आश्वासन दिले होते. आज रोजी  ६ महिने झाले तरी आज रोजी बिलेअदा केली  नाही. यांचाच अर्थ ही एजन्सी नियमानुसार काम करत नाही . म्हणून मी त्या एजन्सी व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन दिले कारण या कामांसाठी परत लवकर निधी मिळत नाही.

    वरील सर्व कामे ही प्रवीण खरात या एजन्सीला मिळालेली आहेत.तक्रार अर्जाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहेत.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८