महानिर्मिती'च्या अभियंता पदासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक -उपमुख्यमंत्री

नागपूर विशेष प्रतिनिधी : राज्य शासनाच्या अंगीकृत वीज वितरण महानिर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ व सहायक अभियंता पदाच्या भरतीची जाहिरात महानिर्मिती कंपनीमार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील गट अ आणि ब वर्गासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. याबाबत ५ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच सेवा प्रवेश नियमात ही सुधारणा करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

    याबाबत सदस्य चेतन तुपे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य जयंत पाटील, दीपक चव्हाण छगन भुजबळ आदींनी सहभाग घेतला. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.राज्य शासनाच्या सेवेत प्रवेशासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य तुपे बच्चू कडू आदींनी सहभाग घेतला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८