आदित्य बिरला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या संघास

मुंबई प्रतिनिधी : आदित्य बिरला मेमोरियल पोलो चषक २०२३ च्या विजेत्या डायनॅमिक संघाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.महालक्ष्मी येथील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब मैदान येथे आदित्य बिरला मेमोरियल पोलो कपचा अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी श्रीमती सुदेशजी धनखड  राजश्री बिरला कुमार मंगलम बिरला उपस्थित होते. या सामन्याचा प्रारंभ उपराष्ट्रपती धनखड यांनी चेंडू फेकून केला.

    अंतिम सामना मॅडॉन पोलो आणि डायनॅमिक्स अचिव्हर्स संघामध्ये रंगला. यामध्ये डायनॅमिक्स अचिव्हर्स संघ विजेता ठरला. यावेळी प्रत्येक खेळाडूचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती धनखड यांनी आदित्य बिरला यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. या सामन्यावेळी बिरला समुहाचे आणि इंडियन पोलो असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

 उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आज सपत्नीक आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.  यावेळी  सेना  दलाचे वरिष्ठ अधिकारी राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोलीस विभागाचे अधिकारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी  उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८