"माझा श्वास - माझं कल्याण" हे ब्रीद वाक्य

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ स्पर्धेमध्ये महापालिकेस मिळालेला पुरस्कार हे सर्वांच्या सहभागाचे फलित आहे !-डॉ.भाऊसाहेब दांगडे आयुक्त

ल्याण प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ स्पर्धेमध्ये महापालिकेस मिळालेला पुरस्कार हे सर्वांच्या सहभागाचे फलित आहे असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी काढले. शासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस‍ द्वितीय क्रमांकाचे रु. १० कोटीचे पारितोषिक जाहिर झाले. याबाबत स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ज्या-ज्या संस्थानी महानगरपालिकेस मदत केली होती, त्यांच्यासाठी आयोजिलेल्या कृतज्ञता सोहळ्या समयी बोलताना त्यांनी हे उद्गार काढले.

   स्पर्धा झाली म्हणजे काम झाले नाही, ही तर सुरुवात आहे आता नविन कन्सल्टंट नेमून नविनतम संकल्पना राबविणार आहोत. शासनातर्फे प्राप्त होणारे रु. १० कोटी हे पूर्णपणे शहर सौंदर्यीकरणासाठीच खर्च केले जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. नेतीवली टेकडीवरील घरे आकर्षकरित्या रंगविल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली. त्यामुळे आमदार मा.प्रमोद रतन पाटील यांचे विशेष आभार त्यांनी आपल्या भाषणात मांडले. कल्याण डोंबिवली शहरात रस्ते दुभाजकांना रंगरंगोटी, इलेक्ट्रीक कप स्टोन, तलाव सुशोभिकरण, भिंतींवर सुंदर चित्रांचे रेखाटन, चौक, वाहतुक बेटे सुशोभिकरण, कारंजे, जीव्हीपी निर्मुलन इ. साठी महापालिकेस सहकार्य केलेल्या, शहर सौंदर्यीकरणात योगदान दिल्याबाबत सर्व संस्थाचे, हॉस्पीटलचे व नागरीकांचे त्यांनी आभार मानले. कच-याची विल्हेवाट अधिक चांगल्याप्रकारे करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे जीव्हीव्ही पॉईंट् पूर्णपणे बंद करण्याचे महापालिकेचे उद्दीष्ट आहेत असे ते पुढे म्हणाले.

   स्वच्छ भारत मिशनचे महापालिकेचे ब्रँन्ड ॲम्बेसिडर डॉ.प्रशांत पाटील यांनी यावेळी सामयोचित भाषण केले. "माझा श्वास - माझं कल्याण" हे ब्रीद वाक्य घेवून पुढे जाऊया असे ते आपल्या भाषणात म्हणाले‍. क्रेडाई एमसीएचआय चे साकेत तिवारी यांनी महापालिकेस शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता यासाठी यापुढे आमचे सहकार्य राहील, अशी ग्वाही आपल्या छोटेखानी भाषणात दिली. महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या समयी शहर सौंदर्यीकरण स्पर्धेसाठी महापालिकेस सहकार्य केलेल्या विविध संघटना, सामाजिक संस्था, रुग्णालये, एनजीओज, इंडियन मेडिकल असोसिएशन, क्रेडाई एमसीएचआय इ. संस्थांचा महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.‍ त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या शहरी कार्य मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या "FREEDOM TO WALK, CYCLE AND RUN CAMPAIGN" 

   या देशपातळीवरील स्पर्धेत धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या सहा.अभियंता अजित देसाई यांचा तसेच चालण्यामध्ये तृतीय क्रमांक मिळविलेल्या प्रभारी उद्यान अधिक्षक अनिल तामोरे यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.‍ तसेच राज्य शासनातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे रु. २ लाख रक्कमेचे पारितोषिक मिळविलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या टिमचा देखील प्रशस्तीपत्र देवून महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.‍ या समयी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे महापालिका सचिव संजय जाधव उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत व इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८