उपलब्ध होणा-या वाहनांमुळे घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होईल -आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे

ल्याण प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला उपलब्ध होणा-या वाहनांमुळे घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होईल असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज काढले. महापालिका मुख्यालया नजीकच्या जवळच्या सुभाष मैदानात घनकचरा विभागात उपलब्ध झालेल्या ११ सीएनजी डंपर गाड्यांचे लोकार्पण करतेवेळी आज सकाळी त्यांनी हे उद्गार काढले.

    स्वच्छ भारत मिशन १ व २ मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकरीता इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे आणि त्याच्या बळकटीकरणाचे काम महानगरपालिकेमध्ये चालू आहे आज आपल्याला ११ डंपर प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला १३ आर.सी. गाड्या मिळतील ४३ घंटा गाड्या पुढील महिन्यात प्राप्त होतील. त्याचप्रमाणे २ धुळ प्रतिबंधक वाहने प्राप्त होत आहेत त्याचबरोबर ४ मॅकेनिकल् स्विपर देखील महापालिकेच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत. ही सर्व वाहने उपलब्ध झाल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे. नविन वाहने खरेदी केली आहेत ती सी.एन.जी. वर चालणार आहेत. आणि त्यातून प्रदुषण कमी होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

    स्वच्छ भारत मिशन-१ अंतर्गत प्रत्येक प्रभागासाठी १ याप्रमाणे १० मोबाईल टॉयलेट युनिट आपण खरेदी करत आहोत. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत महापालिकेमार्फत ओल्या कच-यावर प्रक्रिया करुन त्यापासून सीएनजी बनविण्याचा प्रकल्प लवकरच कार्यान्वीत करण्याचे प्रस्तावित आहे. यामधून  सीएनजी डंपर गाड्या चालविल्या जाणार असून त्यामुळे महापालिकेच्या खर्चात व इंधन वापरात बचत होणार असल्याची माहिती देखील महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

   या लोकार्पण समयी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, महापालिका सचिव संजय जाधव घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी वाहन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८